देगाव फाट्याजवळ 9 लाखाचे लोखंडी साहित्य हस्गत


स्थैर्य, सातारा, दि. १९: देगाव फाट्याजवळ एकाकडून ट्रक व लोखंडी कॉस्टिंगचे जॉब असा मिळून 9 लाख 31 हजारांचे मुद्देमाल मिळून आला. त्यास हे साहित्य कोठून आणले याचे समाधानकारक उत्तर पोलिसांना देता न आल्याने पोलिसांनी साहित्य ताब्यात घेवून तपास सुरू केला आहे. जावेद मौल शेख रा. अहिरे कॉलनी, देगाव फाटा सातारा असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचो उल्लंघन प्रकरणी शेख याच्यावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, कोवीड 19च्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अत्यावश्यक सेवा वगळता इतर साहित्य विक्री करणार्‍यांवर कारवाई करत आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जावेद मौल शेख वय 43 याच्याकडे लोखंडी साहित्य असल्याचे समजले. पोलिसांनी अहिरे कॉलनी देगाव येथे जावून कारवाई केली. यावेळी जावेद शेख याच्या ताब्यात 142.75 किलो लोखंडी कॉस्टिंगचे गोल जॉब, लोखंडी कॉस्टिंगच्या ओबडधोबड लाईनर पाईप, 43.8 किलो वजनाचे लोखंडी रॉड, लहान मोठ्या आकाराचे लोखंडी जॉब, लोखंडी खीस तसेच 6 लाखाचा एक ट्रक असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी मालाबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना जावेद शेख यास समाधानकारक उत्तर देता आले नाही. हे साहित्य चोरीचे अगर लबाडीचे असल्याचा पोलिसांना संशय असून पोलिस याबाबत चौकशी करत आहेत. तसेच जावेद खान याच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनही झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास हवालदार जाधव करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!