स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईतील ७८% भाडेकरूंचे २०२१ मध्ये स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न: नोब्रोकर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 19, 2021
in इतर
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि. १९: कोरोना साथीच्या काळात लोकांना स्वतःच्या घराची गरज प्रकर्षाने जाणवली असून मुंबईतील ७८% भाडेकरू २०२१ मध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पहात असल्याचे नोब्रोकर डॉटकॉमच्या ‘इंडिया रिअल इस्टेट रिपोर्ट २०२०’ मधून निदर्शनास आले आहे. सोसायटीत राहण्याची इच्छा असलेल्या खरेदीदारांची संख्याही मुंबईत सर्वाधिक (८२%) आहे. शहरात स्वतंत्र घराची कमतरता असल्याने तसेच वाढीव सुरक्षा आणि सोसायटीत असलेल्या निवासासाठीच्या सोयी यामुळे हा ट्रेंड दिसून येत असल्याचे या रिअल इस्टेट पोर्टलच्या पाहणीतून निदर्शनास आले आहे.

रिअल इस्टेट रिपोर्ट २०२० मधील मुंबईतील मालमत्ता खरेदीतील प्रमुख ट्रेंड्स:

मुंबईत घर शोधणा-यांपैकी बहुतांश (८७%)) लोक रेडी-टू-मूव्ह-इन किंवा रिसेलच्या घरांना प्राधान्य देतात. अंडर-कंस्ट्रक्शन प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या लोकांना आलेल्या अडचणी पाहता हा एक योग्य पर्याय ठरतो. मुंबईतील सुमारे तीन चतुर्थांश (७३%) लोक हे पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करत असून बहुतांश खरेदीदार (९२%) कायमस्वरूपी मालमत्ता तर ८% लोक गुंतवणूकीच्या उद्देशाने मालमत्ता खरेदी करत आहेत. नवीन घर खरेदी करताना मुंबईतील जवळपास ६७% नागरिक वास्तूच्या नियमांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्व देतात.

मुबईत मालमत्तेचा शोध घेणा-यांपैकी सर्वाधिक २०% लोक घर खरेदीसाठी १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त बजेटचे घर घेण्यास उत्सुक आहेत. यामागे या भागातील प्रॉपर्टीचे वाढीव दर तसेच स्टँप ड्युटीच्या शुल्कात झालेली कपात ही कारणे असावीत असा अंदाज आहे. मुंबईमध्ये १ बीएचके घर शोधणा-या  लोकांची संख्या (४९%) सर्वाधिक आहे. शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर साथीच्या आजाराचा परिणाम झाल्याने दर चौरस फूट किंमतीत ३.७% एवढी घसरण दिसून आली. हे भारतातील बहुतांश मोठ्या शहराततील ट्रेंडनुसारच आहे.

टॉप रेंटल ट्रेंड्स:

मुंबईतील भाडेकरूंपैकी बहुतांश लोक रिअल इस्टेट ब्रोकर्सना सक्रियतेने टाळत होते. प्रतिसाद देणा-यांपैकी ४३% लोक रियल इस्टेट वेबसाइटची निवड करतात तर ४१% लोक त्यांच्या सामाजिक संबंधांतून, मध्यस्थांकडून शोध घेतात. अनावश्यक ब्रोकरेज शुल्क टाळण्यासाठी हे केले गेले असावे.

सुरक्षा ही मुंबईतील ६६% भाडेकरूंसाठी सर्वात महत्त्वाची सुविधा आहे. त्यापैकी १३% लोकांनी सुरक्षिततेसाठी व्हिजिटर व सोसायटी मॅनेजमेंट अॅपच्या शोधात असल्याचे म्हटले. स्वतंत्र घर आणि स्वतंत्र मजल्यांऐवजी सोसायटीत निवास शोधणाऱ्या भाडेकरूंचे प्रमाणही मुंबईत सर्वाधिक (७५%) एवढे आढळून आले.

साथीच्या काळात डिजिटल पेमेंट टूलचा सर्वाधिक वापर झाला. मुंबईतील दोन तृतीयांश (63%) भाडेकरूंनी त्यांचे भाडे बँक ट्रान्सफर किंवा नोब्रोकर पेच्या माध्यमातून दिले. डिजिटल व्यवहारांमध्ये मुंबई आणि पुण्याने बाजी मारली. त्यापैकी २४% लोकांनीच रोख रकमेद्वारे व्यवहार केला. मुंबईतील ८८% भाडेकरूंनी त्यांचे रेंटल अॅग्रीमेंट करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलचा वापर करतात. इतर शहरांपेक्षा हे पुन्हा एकदा सर्वाधिक प्रमाण आहे.

साथीच्या पार्श्वभूमीवर या भागाने नकारात्मक भाडेवाढ अनुभवली. मागील वर्षाच्या तुलनेत, १.५६% नी सरासरी भाडे घटले.

कोरोना काळात मालकांनी जपली माणूसकी:

कोव्हिड-१९ संकटाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नोब्रोकर डॉटकॉमने आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण केले. मुंबईतील सर्वेक्षण केलेल्या मालकांपैकी जवळपास निम्म्या (४९%) घरमालकांनी लॉकडाऊनदरम्यान भाडेकरूंच्या फायद्यासाठी काही भाडे माफ केले.

शहरातील ७९% घरमालकांनी भाड्यासाठी संपूर्ण कुटुंबाला प्राधान्य दिले. मुंबईतील फक्त १९% घरमालकांनी बॅचलर्सना भाड्याने घर देण्याची इच्छा व्यक्त केली.

नोब्रोकर डॉटकॉमचे सहसंस्थापक आणि सीबीओ सौरभ गर्ग म्हणाले, “२०२० मधील हे ट्रेंड्स साथीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण करणे कठीण आहे. या साथीने लोकांना स्वत:च्या घराची किंमत कळाली. सहभागींपैकी ७८% लोक २०२१ मध्ये घर खरेदीचा विचार करत आहेत. विषाणूच्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या सुरक्षेच्या चिंतेमुळे खरेदीदार तसेच भाडेकरूंना सोसायटीतील निवासाची गरज भासली, जेथे नव्या काळातील अॅपद्वारे निवासाचा अनुभव वृद्धिंगत केला जातो. हा ट्रेंड यापुढेही टिकून राहिल असे आम्हाला वाटते.”


ADVERTISEMENT
Previous Post

प्रत्येक गावाचा विकास करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू – आ. शिवेंद्रसिंहराजे

Next Post

त्रिशंकू भागातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ आ. शिवेंद्रसिंहराजे;

Next Post

त्रिशंकू भागातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ आ. शिवेंद्रसिंहराजे;

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारला अपघात, टायर फुटल्याने महामार्गावर दोन कारची धडक

March 3, 2021

‘अमोल भावा तू नवीन आहेस, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ

March 3, 2021

वहिवाटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, शाहूनगरमधील अमराई रेसीडेन्सी येथील घटना

March 3, 2021

सुरूर येथे एकावर जीवघेणा हल्ला

March 3, 2021

धूम स्टाईलने मंगळसुत्र हिसकावून दोघांचा पोबारा 

March 3, 2021

वसुलीसाठी गेलेल्या नगरपंचायत कर्मचार्‍यांना कोंडून धक्काबुक्की लोणंद येथील धक्कादायक प्रकार

March 3, 2021

फलटणला कापूस खरेदी केंद्र सुरु करावे: आमदार दीपक चव्हाण यांची विधानसभेत मागणी

March 3, 2021

पेट्रोल दरवाढीमुळे फलटण तालुक्यात चक्क पेट्रोल लाईनमधुन पेट्रोल चोरीचा प्रयत्न

March 2, 2021

राष्ट्रीय सुरक्षा दिन

March 2, 2021

व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

March 2, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.