सातारा जिल्ह्यातील ४४० ‘उमेद’ समूहांना ७ कोटी कर्ज वाटप


दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२२ । सातारा । जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,  सातारा व  बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा क्षेत्र यांच्या वतीने आयोजित महा कर्ज वितरण मेळाव्यात मौजे भुईंज, ता. वाई , येथे 440 स्वयंसहायता समूहांना एकुण 6 कोटी 53 लाख रु कर्ज वाटप करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनुसार आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मा.जिल्हाधिकारी सातारा श्री. शेखर सिंह  साहेब व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा  जी.सी. साहेब यांच्या सूचनेप्रमाणे मा. सुषमा देसाई मॅडम प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  सातारा. यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 20 मे 2022 . रोजी सातारा जिल्ह्यातील उमेद अंतर्गत  कार्यरत स्वयंसहाय्यता समूहांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या 5 तालुक्यातील शाखा (जावली, वाई ,कोरेगाव  खंडाळा व सातारा) मिळून महा कर्जवितरण (Credit Outreach Program)    मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी  मा. श्री. आशिष पांडे सर , कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र, श्री. विवेक नाचणे सर क्षेत्रीय प्रबंधक सातारा क्षेत्र, मा. श्री.श्रीकृष्ण झेले सर  क्षेत्रीय उपप्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र,  सातारा क्षेत्र ,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सातारा मार्फत श्री. मनोजकुमार राजे सर जिल्हा अभियान व्यवस्थापक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,  जिल्हा परिषद सातारा, मा. श्री संजय निकम सर जिल्हा कार्य व्यवस्थापक (स्मार्ट), सातारा, मा. गोडसे मॅडम, मा.पोळ मॅडम जिल्हा उद्योग केंद्र, सातारा. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना (PMFME) चे मुख्य प्रशिक्षक मा. श्री लिनेश निकम सर मा . श्री युवराज पाटील साहेब जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सातारा, उपस्थित होते .
सदर कार्यक्रमात  कवठे तालुका वाई या गावातील माऊली बचत समूहाच्या सदस्य जयश्री संजय कदम (मयत) यांचे वारस मुलगी विजया संजय कदम हिला व कृष्णाई समूहातील सिंधू राजेंद्र जाधव (मयत) यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री जीवन ज्योती या विमा योजनेअंतर्गत रुपये 2 लाख विम्याच्या रकमेचा धनादेश श्री. आशिष पांडे सर कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते वितरित करण्यात आला .
तर सदर कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी मा. श्री नितीराज साबळे जिल्हा आर्थिक साक्षरता सल्लागार बँक ऑफ महाराष्ट्र  सातारा, श्री. रंजनकुमार वायदंडे जिल्हा  व्यवस्थापक आर्थिक समावेशन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद ,सातारा. श्री. निलेश भोसले सर जिल्हा व्यवस्थापक, कृतीसंगम (Convergence) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , सातारा, श्रीमती पुनम गायकवाड मॅडम, तालुका अभियान व्यवस्थापक ,वाई ,श्री प्रविण खुडे सर तालुका अभियान व्यवस्थापक, खंडाळा, श्री. अल्पेश खरात सर तालुका व्यवस्थापक जावळी, श्री. सौरभ फरांदे सर तालुका व्यवस्थापक, वाई, श्री. राजेश चव्हाण सर तालुका व्यवस्थापक, खंडाळा, (MIS  मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम) श्री. काशिनाथ कुंभार सर तालुका व्यवस्थापक , आर्थिक समावेशन, खंडाळा. श्री संदीप कांबळे सर तालुका व्यवस्थापक, आर्थिक  समावेशन, कोरेगाव, त्याचप्रमाणे चारही तालुक्यातील प्रभाग समन्वयक श्रीमती संगीता देशमाने मॅडम, जावळी , श्रीमती दिपाली महामुनी मॅडम ,कोरेगाव. श्रीमती रेश्मा धायगुडे मॅडम, खंडाळा. श्रीमती माधवी मतकर मॅडम, कौशल्य समन्वयक, वाई  व  संबंधित बँकेचे शाखा व्यवस्थापक, उमेद अभियान अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती व बँक सखीताई, आर्थिक साक्षरता सखीताई 5 ही तालुक्यातील बचत समूहाचे अध्यक्ष,सचिव,सदस्य त्याचप्रमाणे 5 ही तालुक्यातील ग्रामसंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!