
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, म्हसवड : म्हसवड शहरातील कोरोनाचा आकडा हा काही केल्या कमी येत नसल्याने म्हसवडकर नागरीकांच्या व प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असतानाच दि. २८ रोजी आलेल्या कोरोना अहवालानुसार म्हसवड शहरात पुन्हा ६ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
म्हसवड शहराच्या आलेल्या कोरोना अहवालानुसार येथील मासाळ टेक येथील ६६ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील ५३ वर्षीय पुरुष, माळी गल्ली येथील १८ वर्षीय युवक, १६ वर्षीय युवती, तर शिक्षक कॉलनी येथील ४७ वर्षीय पुरुष आदींना कोरोना संसर्ग ची बाधा झाली असुन या नव्या ६ रुग्णांमुळे म्हसवड शहरातील कोरोना बाधितांचा आकडा हा १४१ वर पोहचला आहे.
