
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.४: येथील शाहू स्टेडियमजवळील आयसीआयसीआय बँकेसमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याबाबत सुधीर चंद्रकांत साळुंखे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साळुंखे यांनी दि. 2 रोजी शाहू स्टेडियम, आयसीआयसीआय बँकेसमोर पांढर्या रंगाची अॅक्टिव्हा (एमएच 11 सीके 3946) पार्क केली होती. अज्ञाताने ती चोरून नेली. याप्रकरणी शाहपूरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
