स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डिजिटल ब्रोकर निवडण्याची ५ कारणे

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 4, 2021
in संपादकीय
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.४: भारतातील अभूतपूर्व डिजिटल स्वीकाराचा थेट परिणाम सुरक्षितता व एक्सचेंज इंडस्ट्रीवर झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीसारख्या बेंचमार्क निर्देशांकांनी जवळपास ५०% पेक्षा जास्त परतावे मागील ४ वर्षात दिले. ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ सारख्या उपक्रमांनी पाठिंब दर्शवलेल्या भारतीय बाजजाराने शाश्वत गती दर्शवली आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना या संधीचा फायदा घ्यायचा आहे.  त्यामुळे तुमचीही शेअर गुंतवणुकीच्या जगात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर डिजिटल ब्रोकरसोबत यात प्रवेश का करावा याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंगचे सीएम श्री प्रभाकर तिवारी.

१. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म: डिजिटल ब्रोकरची निवड करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ते तुम्हाला ट्रेडिंगकरिता माहितीपूर्ण प्लॅटफॉर्मची सुविधा देतात. ऑफलाइन ब्रोकर तुम्हाला स्टॉकविषयी शिफारशी देतात. मात्र त्या स्टॉकमध्ये स्वत: रिसर्च करणे तुम्हाला अवघड जाईल. त्यामुळे तुम्हाला वरवरचे विश्लेषण करून समाधान मानावे लागेल किंवा तुमच्या ब्रोकरवर अंधपणाने अवलंबून रहावे लागेल. यामुळे तुमच्या गतीला आव्हान मिळते व खरेदी-विक्री दरम्यान अयोग्य किंमतींना सामोरे जावे लागते.

तुम्ही डिजिटल ब्रोकरकडे गेल्यास हे सर्व प्रश्न तत्काळ सुटतात. असे ब्रोकर खास करून चार्टची सुविधा, मार्केट स्कॅनर आणि मोबाइल ट्रेडिंग अॅप्लिकेशनची सुविधा पुरवतात. या घटकांमुळे डिजिटल ब्रोकर हा गुंतवणूकदारासाठी महत्त्वाचा ठरतो. ब्रोकरने त्याच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर काही शुल्क लावले आहे का, हे तपासून पहावे.

२. ट्रेडिंग किंमत: डिजिटल ब्रोकरचे महत्त्व सांगण्यामागील आणखी एक कारण म्हणजे ट्रेडिंगची किंमत. ट्रेडिंग कॉस्टमध्ये ब्रोकरेज व व्यवहार शुल्कापासून एएमसी, डिमॅट चार्ज आणि टॅक्सपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. आता त्यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे परसेंटेज आधारीत ब्रोकरेज. म्हणजेच प्रत्येक व्यापार मूल्यावर (खरेदी किंवा विक्री दोन्हीतही) तुम्हाला पूर्वनिश्चित टक्के शुल्क द्यावे लागते.

ऑफलाइन ब्रोकर्स आणि काही डिजिटल ब्रोकरदेखील परसेंटेज आधारीत ब्रोकरेज पद्धत वापरत असल्याने गुंतवणुकदारांसाठी ते कमी फायद्याचे ठरते. तथापि, अग्रेसर डिजिटल ब्रोकर्स कमी शुल्क आकारतात, फिक्स ब्रोकरेज घेतात, संपूर्ण ऑर्डरच्या एकूण मूल्याऐवजी ट्रेड ऑर्डरवर फ्लॅट फी आकारली जाते. काही डिजिटल ब्रोकर्सचे इक्विटी डिलिव्हरीसाठी शून्य ब्रोकरेजदेखील असे. अशा घटकांमुळे आपल्या एकूण कमाईत मोठा फरक पडतो.

३. संशोधन क्षमता: सध्याचे डिजिटल युग व डाटा हे नवे तेल व सोन्यासारखे आहे. स्टॉकच्या किंमती वित्त, बाजारातील कामगिरी, त्रैमासिक निकाल, प्रमोटर शेअरहोल्डिंग पॅटर्न, रेग्युलेटरी उपाययोजना, जिओपॉलिटिकल घटना, गुंतवणुकादारांच्या भावना इत्यादी विस्तृत श्रेणीतील डाटावर आधारीत असतात. त्यामळे शेअर बाजारातील स्टॉक्सच्या किंमतींचा बऱ्यापैकी अंदाज येतो. तंत्रज्ञान हे डिजिटल ब्रोकर्सचे वैशिष्ट्य असल्यामुळे ते अत्याधुनिक संशोधनाची क्षमता बाळगून असतात. काही अत्याधुनिक डिजिटल ब्रोकर्सनी गुंतवणूक इंजिनही विकसित केले आहेत, जे एखादी शिफारस करण्यापूर्वी १ अब्ज डाटा पॉइंट्सचे विश्लेषण करते.

४. मार्जिनचा फायदा: तुमच्या खऱ्या गुंतवणुकीपेक्षा जास्त ट्रेडिंग करण्यासाठी मार्जिन ट्रेडिंग केली जाते. डे ट्रेडर्समार्फत ही सुविधा वापरली जाते. तसेच तुमच्या एकंदरीत प्रॉफिटमध्ये मोठा फरक दिसून येतो. पण तुम्ही स्टॉक ट्रेडिंगमध्ये नवे असाल तर तुम्ही मार्जिन ट्रेडिंगमधील जोखीम समजून घेतली पाहिजे. गोष्टी हाताबाहेर गेल्या तर तुम्ही तुमच्या गुंतवणूकीचे पूर्ण नुकसान होण्यापासून वाचवू शकतात. ही सुविधा फक्त अनुभवी ट्रेडर्सनी त्यासोबतची जोखीम समजून घेत वापरली पाहिजे.

५. ग्राहक सेवा: अखेरचे म्हणजे, डिजिटल ब्रोकर तुम्हाला केवळ एका बटणाच्या स्पर्शाद्वारे अनेक सेवा उत्कृष्टरित्या प्रदान करतो. त्यापैकी काहींकडे ऑनलाइन कस्टमर केअर प्रतिनिधी, रिलेशन मॅनेजर्स आणि 24×7 कस्टमर हेल्पलाइन नंबर्सची सुविधा असते. मूल्य आधारीत ब्रोकर्स यापुढेही जाऊन निवडक रिसर्च मटेरिअल्स गुंतवणूकदारांसाठी पुरवतात व वैयक्तिकृत सल्ला देतात. तुम्ही वेबिनार्स, पॉडकास्ट्स आणि इतर संबंधित ग्राहक केंद्रित उपक्रमांचाही लाभ घेऊ शकता.

भारतातील सकारात्मक बिझनेस स्थितीसह रिटेल गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग पाहता, भारतीय शेअर बाजाराला अद्याप बरीच प्रगती करायची आहे, असे म्हणता येईल. जानेवारी १९९९ व जानेवारी २००९ दरम्यान ते तीन पटींनी वाढले. पुढील १० वर्षात ते जवळपास चौपट होईल. आतापासूनची गुंतवणूक १० वर्षांनी कुठे असेल, याचा विचार करा आणि हुशारीने गुंतवणूक करा.


ADVERTISEMENT
Previous Post

यप्पटीव्हीची बीएसएनएलसोबत भागीदारी

Next Post

चित्राताई वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करणे ही विरोधकांची मुस्कटदाबी : भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी

Next Post

चित्राताई वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करणे ही विरोधकांची मुस्कटदाबी : भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी : श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर

March 6, 2021

जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान

March 6, 2021
औंध येथील उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करताना तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर व अन्य

औंध येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी ही सुरू; तालुका कूषी अधिकार्यांची उपोषण स्थळी भेट

March 6, 2021

महिलेचा विनयभंग

March 6, 2021

धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

March 6, 2021

आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु.।। येथे स्वागत

March 6, 2021

महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

March 6, 2021

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करूनच रस्त्याची कामे सुरू करावीत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 6, 2021

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

March 6, 2021

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

March 6, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.