“गोविंद” मिल्कच्या वतीने फलटणच्या श्रीराम मंदिर शिखर जीर्णोद्धारासाठी 5 लाखाचा धनादेश अदा


दैनिक स्थैर्य | दि. 22 जानेवारी 2024 | फलटण | फलटणकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर व श्री दत्त मंदिर शिखर जीर्णोद्धारासाठी “गोविंद” मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या वतीने चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नाईक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे रुपये 5 लाख 1 हजार रूपायांचा धनादेश सुपूर्त केला आहे.

आज दि. 22 जानेवारी रोजी फलटण येथील प्रभू श्रीराम मंदिर व दत्त मंदिर शिखर जीर्णोद्धार हा विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, मोहनराव नाईक निंबाळकर, हेमंत रानडे, रमणशेठ दोषी, मिलिंद नेवसे, विवेक शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!