आसनगाव येथे फळबाग लागवडीच्या आयताकृती प्रणालीबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२४ | फलटण |
कोरेगाव तालुक्यातील आसनगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटणच्या आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत फळबाग (आंबा) लागवडीसाठी वापरली जाणारी आयताकृती प्रणालीची माहिती शेतकर्‍यांना दिली.

या प्रणालीत फळझाडांमधील अचूक अंतर कसे घ्यावे, जेणेकरून उत्पादन क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, तसेच या आयताकृती प्रणालीद्वारे झाडांतर्गतची घनता कशा प्रकारे वाढवता येईल, याबद्दलची माहिती शेतकर्‍यांना दिली.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडीत व प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत शुभम मोरे, विजय नाळे, सिद्धांत फडतरे, अनिकेत मदने, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक खोसे, अजिंक्य मोरे या कृषीदूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.


Back to top button
Don`t copy text!