विडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास


 

स्थैर्य, फलटण, दि.२८ : विडणी, ता.फलटण येथील शेतकर्‍यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या गोडावून मधून 45 हजार रुपये किंमतीच्या कांद्याच्या थैल्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

विजेचा लपंडाव, रात्री – अपरात्री विंचू काट्याचा धोका पत्करुन, रक्ताचे पाणी करुन शेतकरी आपली पिके जोपासत असतो. त्यात नुकतीच अवकाळी पावसाने अनेक शेतकर्‍यांची उभी पिके शेतात नासून गेली. मात्र यातून काही शेतकर्‍यांना शेतातील कांदा वाचवण्यात यश आले होते. कधी नव्हे एवढा कांद्याला सोन्याचा भाव मिळू लागला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या खिशात चार पैसे खेळू लागले. मात्र यावर पण चोरट्यांनी डोळा ठेवून विडणी ता.फलटण (25फाटा नाळे वस्ती) येथील भरत नाथबुवा नाळे, सुरेश विठ्ठल नाळे, सुनिल विठ्ठल नाळे या शेतकर्‍यांनी घराशेजारी असणार्‍या कांदा साठवून ठेवलेल्या पञ्याच्या शेड गोडाऊन मधुन तिघांचे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये किंमतीचा साठ ते पासष्ठ किलो वजनाच्या जवळपास एकटन वजनाच्या पंधरा कांद्याच्या पिशव्या रात्री 12 ते 1 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडावून मधून लंपास केला. दरम्यान कुत्री भुकंण्याच्या आवाजाने संबधित मालकाला जाग आल्यावर घराशेजारील कांद्याच्या पिशव्या चोरट्यांनी चोरुन नेल्याचे मालकाच्या लक्षात आले.

ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘चाय स्क्वेअर अँड कॅफे’ चे उद्घाटन संपन्न

सकाळी पोलिस पाटील धनाजी नेरकर यांना सदर घटनेची माहीती दिल्यावर पोलिस पाटील यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाणेत कळवून फलटण ग्रामीण पोलिस ठाणेतील कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाणेत भरत नाथबुवा नाळे, सुरेश विठ्ठल नाळे, सुनिल विठ्ठल नाळे यांनी तक्रार दाखल केली आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!