लायन्स क्लब फलटण गोल्डनचे कार्य आदर्शवत : लायन रवींद्र देशपांडे


 

सौ.उज्वला निंबाळकर यांचा सत्कार करताना रवींद्र देशपांडे. समवेत राजेंद्र वडगुळे, बाळासाहेब भोंगळे, बापू जगताप, नीलम पाटील.

स्थैर्य, फलटण, दि.२८ : लायन्स क्लब फलटण गोल्डनने अल्पावधीत केलेले सामाजिक काम आदशर्वत असल्याचे गौरवोद्गार प्रांतपाल एम.जे.एफ.लायन रवींद्र देशपांडे यांनी काढले.

लायन्स क्लब फलटण गोल्डनचा जुलै 2020 ते ऑक्टोबर 2020 या तीन महिन्यातील सेवा कार्यात प्रांत 3234 डी 1 मधील 63 क्लब्जमध्ये तिसरा तर 30 पेक्षा कमी सदस्य संख्या असणार्‍या क्लब्जमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल रवींद्र देशपांडे यांच्या हस्ते लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या संस्थापक अध्यक्षा लायन सौ.उज्वला निंबाळकर यांचा सत्कार संपन्न झाला त्यावेळी देशपांडे बोलत होते. 

विडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास

देशपांडे पुढे म्हणाले, लायन्स क्लब फलटणने प्रायोजित केलेला लायन्स क्लब फलटण गोल्डन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2020 रोजी 20 महिला सदस्यांसह स्थापन झाला. या क्लबची अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी माजी लायनेस डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लायन सौ.उज्वला निंबाळकर यांनी घेऊन संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी व त्यांच्या टीमने जुलै 2020 ते ऑक्टोबर 2020 या चार महिन्यात उत्तम सेवाकार्य केले आहे. विशेष म्हणजे कोरोनाकाळात सेवा कार्य करत असताना अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून त्यामध्ये कोरोनाविषाणूंचा प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून फलटण तालुक्यात अनेक गावात कमिन्स इंडिया लिमिटेड, घरडा केमिकल्स लिमिटेड व संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कॅल्शियम व सोडियम हायपो क्लोराईट या जंतुनाशकांची फवारणी केली हे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.

कार्यक्रमास सर्व लायन व लायनेस पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!