स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

30% धागा महाग, उन्हा‌ळ्यात वापराची वस्त्रे महाग होणार?

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 17, 2021
in इतर
ADVERTISEMENT

स्थैर्य,भिलवाडा, दि.१७: कोरोनाकाळापासून चार महिने व्यवसाय बंद राहिल्याने माेठी पेंटअप मागणी आणि चीनच्या आयातीत घट आल्याने धागा आणि कपड्याची मागणी आणि पुरवठ्यात फरक आला आहे. यामुळे धाग्यांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. धागा महाग झाल्याने कापडही १० रुपयांवरून ३५ रुपये प्रतिमीटरपर्यंत महाग झाले आहे. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, कापड महाग झाल्याने उन्हाळ्यात कपड्यांचे भाव दहा पटीपर्यंत वाढू शकतात. भिलवाड्याच्या सिंथेटिक वीव्हिंग मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश अग्रवाल यांनी दैनिक भास्करला सांगितले की, पॉलिएस्टर व टेक्श्चराइज सूटिंग गेल्या फेब्रुवारीच्या तुलनेत आता सुमारे १० रु. प्रतिमीटर महाग झाले आहे. सुती कपडा २५ ते ३० रु. प्रतिमीटर आणि डेनिम कपडा प्रतिमीटर ३० ते ३५ रु. महाग झाला आहे. ही तेजी जूनपर्यंत अशीच चालेल. भिलवाडा कापड बाजारात प्रथमच एका वर्षात सुताच्या भावात एवढी तेजी आली, ज्यामुळे कपडाही महाग झाला आहे.

हिवाळ्यातील कपड्यांच्या हंगामात कोरोनामुळे नुकसान सोसणाऱ्या लुधियानाच्या होजियरी आणि गारमेंट उद्योगाला उन्हाळ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, धागे आणि कपड्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे लुधियानाच्या कापड उद्योगाच्या चिंता वाढल्या आहेत. अॅपरल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ लुधियानाचे अध्यक्ष सुदर्शन जैन म्हणाले, लुधियानाचा होजियरी उद्योग उन्हाळ्यातील कपड्यांचा ५००० कोटीचा व्यापार करतो. टी शर्टपासून स्पोर्ट्‌स विअरमध्ये वापर होणाऱ्या लाइक्राची किंमत नोव्हेंबरमध्ये ४०० रु. प्रतिकिलो होती, जी ८०० रु. प्रतिकिलो झाली. कॉटन, पॉलिएस्टर व उर्वरित सुताच्या किमतीही ३५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत महाग झाल्या. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने ३०० कोटींहून जास्तीचा बोजा उद्योगावर पडू शकतो.

मागणी खूप चांगली आहे. मात्र, कच्चा माल खूप महाग झाला आहे. उत्पादनांच्या किमती ६ ते १० % पर्यंत वाढवत आहोत. किमतीचा बोजा स्वत: उचलत आहोत. – कुंतल जैन, ड्यूक फॅशन्स


ADVERTISEMENT
Previous Post

13 वर्षांपूर्वी प्रियकरासोबत मिळून केली होती आपल्याच कुटुंबातील 7 जणांची हत्या

Next Post

नदालला पराभवाचा धक्का; विक्रमी २१ व्या जेतेपदाचे स्वप्न अधुरे

Next Post

नदालला पराभवाचा धक्का; विक्रमी २१ व्या जेतेपदाचे स्वप्न अधुरे

ताज्या बातम्या

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021

थरार! पुणे-सोलापूर महामार्गावर पेट्रोल- डिझेलची वाहतूक करणाऱ्या टॅंकरने घेतला अचानक पेट

March 3, 2021

जम्बो’बाबतचा निर्णय दोन-तीन दिवसांत घेऊ

March 3, 2021

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलीय; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

March 3, 2021

पत्नी ही काही मालमत्ता किंवा वस्तू नाही, तिच्यावर बळजबरी करता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

March 3, 2021

BMCवर कंगना राणौतने केले आरोप, म्हणाली की – ‘आर्किटेक्टना मिळतेय ही धमकी’

March 3, 2021

धक्कादायक! पोलिसांनी वसतीगृहात घुसून तरूणींना कपेड काढून नाचवलं

March 3, 2021

राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारला अपघात, टायर फुटल्याने महामार्गावर दोन कारची धडक

March 3, 2021

‘अमोल भावा तू नवीन आहेस, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ

March 3, 2021

वहिवाटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, शाहूनगरमधील अमराई रेसीडेन्सी येथील घटना

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.