डिपॉझिट मशीनमध्ये ठेवलेले २८००० रुपये लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटणमधील डेक्कन चौकाशेजारी असलेल्या आयडीबीआय बँकेच्या डिपॉजिट मशीनमध्ये ठेवलेले २८,३०० रुपये रोख लंपास केल्याची फिर्याद व्यावसायिक सचिन रामराव निंबाळकर (वय ४३, रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलिसात दिली आहे.

याबाबत माहिती अशी, फलटणमधील डेक्कन चौकाशेजारी असलेल्या आयडीबीआय बँकेच्या डिपॉजिट मशीनमध्ये दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास श्रीराम फुड्स खाद्य पदार्थ विक्री एजन्सी चालविणारे सचिन रामराव निंबाळकर यांनी २८,३००/-रूपये भरणा करण्याकरिता ठेवले होते. त्याचदरम्यान त्यांना फोन आल्याने ते डिपॉजिट मशीनमध्ये डिपॉजिट बटन न दाबता पैसे तसेच ठेवून घरी निघून गेले. त्यानंतर थोड्याच वेळात त्या ठिकाणी एक अनोळखी इसम येऊन त्याने डिपॉजिट मशीनच्या कॅश बॉक्समध्ये फिर्यादीने ठेवलेली २८,३००/- रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला आहे.

या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार माधवी बोडके करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!