आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रॅक्टरवरुन थेट शेतात


स्थैर्य, सातारा, दि.२३: सातारा जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे नेहमी जिल्ह्यातच नव्हे
तर राज्यभरात आपल्या कार्यकुशलतेने आणि नेतृत्वाने चर्चेत असतात.
कार्यकर्त्यांच्या गराड्यातून थेट ते शेतात उतरले असून त्यांनी आपल्या
शेतात कसदार शेतकऱ्याप्रमाणे ट्रॅक्टर चालविला आहे. त्यांचा हा व्हिडिओ
कमालीचा व्हायरल झाल्याने शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात पुन्हा चर्चेत आले
आहेत. 

वृद्ध पित्याकडून मुलाचा खून

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पक्ष कोणताही असो
आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न शासन दरबारी मांडण्यासाठी अग्रेसर असतात.
त्यांनी कोरोना काळातही आपल्या मतदार संघात जाऊन ग्रामस्थांचे मनोबल
वाढविले आहे. याबरोबरच शिवेंद्रसिंहराजे यांचा फिटनेस फंडा तर
सातारकरांच्याबरोबरच अख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यात सायकलिंग,
मॅरेथॉन, ट्रेकिंग आलंच. ट्रेकिंगचं म्हणाल तर त्यांनी हिमालयातही बेस कम्प
केला आहे. तसेच पैराग्लाडिंगही केले आहे.

साताऱ्यात दोन दिवसांत 28 बळी

आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो
शिवेंद्रसिंहराजे यांचा शेतात कसदार शेतकऱ्याप्रमाणे ट्रॅक्टर चालविण्याचा.
प्रत्येक वर्षी दिवाळी संपली की ते आपल्या दौंडला येथील फार्महाऊसवर हमखास
जातात. तसेच त्यांचा आवर्जून शेतीकडे फेरफटका हा असतोच. आमदार
शिवेंद्रसिंहराजे यांचे आपल्या शेतातील मातीत उतरून कसदार शेतकऱ्याप्रमाणे
ट्रॅक्टर चालवणे, शेतात फेरफटका मारणे, शेतीची पूर्ण पाहणी करणे, हे
त्यांचे आवडीचे काम. ते कुटुंबीयांसमवेत शेतात रमल्याचे दिसत आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!