केंद्रीय कोट्यातील MBBSच्या 222 जागा पुन्हा राज्याच्या कोट्यात वर्ग; राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा


 


स्थैर्य, मुंबई, दि.१३  :  राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या केंद्रीय कोट्यातील 222 जागा दुसऱ्या प्रवेश
फेरीनंतरही रिक्त राहिल्याने या जागा पुन्हा राज्याच्या कोट्यात वर्ग
करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील काही विद्यार्थ्यांचे एमबीबीएसचे
स्वप्न पूर्ण होणार आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीनंतर बहुतांश सरकारी तसेच
पालिका रुग्णालयातील बहुतांश जागांवर प्रवेश झाले आहेत. परंतु केंद्रीय
कोट्यातील जागा रिक्त राहिल्याने केंद्राकडून राज्यांना 2098 जागा पुन्हा
वर्ग करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 222 एमबीबीएसच्या आणि 40
दंतवैद्यकच्या जागा राज्याकडे पुन्हा वर्ग करण्यात आल्या आहेत. केंद्रीय
कोट्यातून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही.
त्यामुळे या जागा रिक्त राहिल्याने त्या पुन्हा राज्यांना देण्यात आल्या
आहेत. राज्यात वर्ग करण्यात आलेल्या 222 जागांपैकी 59 जागा या मुंबई व
ठाण्यातील महाविद्यालयातील आहेत. यातील 20 जागा कूपर रुग्णालय, 13 लोकमान्य
टिळक रुग्णालय आणि 12 नायर रुग्णालाशी जोडलेल्या महाविद्यालयात आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!