तुम्ही पासपोर्ट काढताय? फसव्या संकेतस्थळापासून राहा सावध!


 

स्थैर्य, पुणे, दि.१३ : पासपोर्ट विभागाच्या बनावट संकेतस्थळ आणि मोबाइल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अर्जदारांकडील माहिती संकलित करण्यात येत असल्याची बाब परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे नागरिकांनी फसव्या संकेतस्थळास भेट देऊ नये. तसेच, पासपोर्ट सेवांशी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पासपोर्ट विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

बनावट संकेतस्थळावरून अतिरिक्त जादा शुल्क आकारून त्यांना वेळ उपलब्ध करुन सेवा देत आहेत. यापैकी काही बनावट संकेतस्थळाचे डोमेन नोंदणीकृत आहेत. त्यात “.org, .in, .com” उदाहरणार्थ – 

www.indiapassport.org, www.onlinepassportindia.com, www.passportinidiaportal.in, www.passport-seva.in, www.applypassport.org अशी काही संकेतस्थळ निदर्शनास आली आहेत.

त्यामुळे भारतीय पासपोर्ट आणि संबंधित सेवांसाठी नागरिकांनी फसव्या संकेतस्थळास भेट देऊ नये. तसेच, पासपोर्ट सेवांशी आर्थिक व्यवहार करू नये. पासपोर्ट व संबंधित सेवांसाठी भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.passportindia.gov.in हे आहे. तसेच, अर्जदार अधिकृत मोबाइल ऍप mPassportSeva वापरू शकतात, जे Android आणि ios application स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकतात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!