208 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज तर 574 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, सातारा दि.13 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 208 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले  तर 574 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  

विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली तालुक्यातील 11, कराड तालुक्यातील 57, खंडाळा तालुक्यातील 24,खटाव तालुक्यातील 7, कोरेगांव तालुक्यातील 26, महाबळेश्वर तालुक्यातील 5, माण तालुक्यातील 3, पाटण तालुक्यातील  3, फलटण तालुक्यातील 25, सातारा तालुक्यातील 26, वाई तालुक्यातील 21  असे एकूण 208 नागरिकांचा समावेश आहे. 

574 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 93, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 32, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, कोरेगाव 53, वाई येथील 76, शिरवळ 29,  रायगाव 20,  पानमळेवाडी येथील 68, मायणी येथील 22, महाबळेश्वर येथील 90,  खावली 12, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 48 असे एकूण 574 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत अशी माहितीही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुनिल सोनवणे यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने 34728


एकूण बाधित 6504


घरी सोडण्यात आलेले 3101


मृत्यू  206


उपचारार्थ रुग्ण 3197

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!