20 नागरिकास दिला आज डिस्चार्ज; 125 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि.२६:  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 20  नागरिकास  घरी सोडण्यात आले असून 125 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
125 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, फलटण 8, वाई 28,  रायगाव 11, पानमळेवाडी 35, तळमावले 18,  म्हसवड 16,   असे एकूण  125 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
एकूण नमुने -279930
एकूण बाधित -54401
घरी सोडण्यात आलेले -51527
मृत्यू -1795
उपचारार्थ रुग्ण-1079

Back to top button
Don`t copy text!