स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त ब्रम्हपुरी तालुक्याची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

Team Sthairya by Team Sthairya
December 26, 2020
in प्रादेशिक

स्थैर्य, चंद्रपूर दि. २६ : केंद्रीय पथकाने आज चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी  तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पूर येऊन गेल्यानंतरच्या कालावधीत शासनाकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंत 42 कोटींची मदत देण्यात आली. मात्र तरीही पायाभूत सुविधांमधील अनेक मोठी कामे अपूर्ण असून यासाठी आणखी मदतीची गरज असल्याची मागणी नागरिकांनी पथकापुढे आज केली.

दि.30,31 ऑगस्ट व एक सप्टेंबर या कालावधीत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गोसेखुर्दचे 33 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ब्रम्हपुरी, मुल, सावली, गोंडपिंपरी,  सिंदेवाही या 5 तालुक्यांमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यासाठी तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने आतापर्यंत 42 कोटी  कोटींची मदत मंजूर केली. त्यापैकी 36 कोटी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. राज्य शासनाने या पुरामध्ये झालेल्या जीवितहानी, पशुधनाचे नुकसान, पूरग्रस्त भागामधील पुनर्वसन, तात्पुरता निवारा, कृषी मालाचे नुकसान, पुरानंतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,  दुकानदारांना मदत अशा अनेक घटकांमध्ये आतापर्यंत 36 कोटीचे वाटप केले आहे. उर्वरित 6 कोटी रुपयांचे  वितरण लवकरच करण्यात येत आहे.

केंद्रीय पथकाची भेट

ब्रम्हपुरी तालुक्यात राज्य शासनाने केलेले पंचनामे, त्यानंतर केलेली मदत, पायाभूत सुविधांमध्ये झालेले नुकसान, त्यामध्ये करण्यात आलेली दुरूस्ती, आणखी पुढे लागणारी मदत या संदर्भात आज केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली.  यापूर्वी 11 ते 13 सप्टेंबर या कालावधीत पथकाने भेट दिली होती. आजच्या दुसऱ्या पाहणी पथकामध्ये पथक प्रमुख राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली चे सह सचिव रमेश कुमार घंटा, तसेच नवी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे उप सचिव यश पाल, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे आर.बी.कौल, कृषी विभाग नागपूरचे संचालक आर.पी. सिंग, नवी दिल्ली येथील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास, जलशक्ती नागपूरचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार,  जिल्हाधिकारी  अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश  कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा व विविध विभाग प्रमुख सहभागी झाले होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील  कृषी, पायाभूत सुविधा, रस्ते व पूल यांचे नुकसान याची पाहणी करण्यासाठी  केंद्रीय पथकाने लाडज, पिंपळगाव, बेलगाव येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला. याशिवाय या पथकाने विविध ठिकाणी रस्त्यामध्ये थांबत शेतकऱ्यांशी संवाद साधला.  बोटीने प्रवास करत पथकाने लाडज येथील नुकसान झालेल्या शेताची व घरांची पाहणी केली. या ठिकाणी काही नागरिकांनी पडलेल्या घरांसाठी मदतीची मागणी केली. केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी  स्थानिक तलाठी यांच्याकडे याबाबत चौकशी केली. अतिक्रमणधारक, नोंदणी न केलेले पूरग्रस्त, बँकेचे स्वतःचे खाते नसलेले पूरग्रस्त व यादीमध्ये नाव नसलेल्या नागरिकांबाबत नोंदणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

केंद्रीय पथका समोर अनेकांनी आपल्या मागण्या सादर केल्या. त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यापूर्वी पंचनामे केल्यानंतर याद्या ग्रामपंचायतीमध्ये सादर करण्याचे निर्देश दिले होते. पंचनामा केल्यानुसार नुकसान भरपाईबाबत तक्रारी असल्यास त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मदतीचे वाटप, पंचनामे आणि आणखी कोणत्या क्षेत्रांमध्ये मदतीची गरज आहे, यासाठीच केंद्रीय समितीचा हा पाहणी दौरा असल्याचे जिल्हाधिकारी गुल्हाणे यांनी सांगितले.

रस्ते व पुलाचे नुकसान

शेतकऱ्यांना कृषी संदर्भातील नुकसानीसाठी प्राथमिक मदत राज्य शासनामार्फत देण्यात आली आहे. मात्र पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची पाहणी देखील आज करण्यात आली. याशिवाय या दौऱ्यामध्ये पुरामुळे झालेल्या शेत नुकसानीबाबत विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील व मदत वाटपाबाबत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, यांच्याकडून माहिती घेतली. प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर पूरग्रस्तांना मदतीत काही उणीव राहू नये याची चौकशी देखील त्यांनी यावेळी केली. हे पथक या पाहणीनंतर केंद्राला आपला अहवाल सादर करणार आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

शांतीनिकेतन मधल्या विश्व भारती विद्यापीठाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला पंतप्रधानांचे संबोधन

Next Post

20 नागरिकास दिला आज डिस्चार्ज; 125 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Next Post

20 नागरिकास दिला आज डिस्चार्ज; 125 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021

फलटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; पाच जण कोरोनाबाधित

April 18, 2021

फलटण तालुक्यातील १८९ तर सातारा जिल्ह्यातील १४३४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३३ बाधितांचा मृत्यु

April 18, 2021

‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

April 18, 2021

यावर्षी ६०% भारतीय सीएमओनी इन्फ्लूएंसर मार्केटिंगसाठी बजेट राखून ठेवले: क्लॅनकनेक्ट.एआय

April 18, 2021

सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर बाजार स्थिरावला, मात्र अद्याप गर्तेतून सावरला नाही

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.