भाजप उमेदवार किरण राऊत – मंगलादेवी नाईक निंबाळकर यांची प्रचारात मुसंडी ! रणजितदादांच्या कामांचा पाढा वाचत विकासासाठी मागितली साथ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २५ नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण राऊत आणि मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी सध्या मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद साधण्यावर भर दिला आहे.

हे दोन्ही उमेदवार मतदारांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरासाठी मंजूर करून आणलेल्या विकासकामांची यादी सांगत आहेत. तसेच, पुढील काळात होऊ घातलेल्या कामांचा पाढाही ते वाचून दाखवत आहेत.

ते मतदारांना सांगतात की, फलटण शहराला आणि आपल्या प्रभागाला विकासात आघाडीवर ठेवण्यासाठी भाजपाला मतदान करून रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे हात बळकट करावेत.

एकंदरीत, भाजप उमेदवारांनी मागील कामांची नोंद आणि भविष्यातील विकास या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपला प्रचार उभा केला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!