फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला कमाल २ हजार रुपयांचा दर; १५१७ क्विंटलची आवक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २ जून : कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारात आज (मंगळवार, दि. २ जून) कांद्याची समाधानकारक आवक पाहायला मिळाली. आज बाजारात एकूण १५१७ क्विंटल (३०३४ पिशव्या) कांद्याची आवक झाली असून, कांद्याला कमाल २,००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मंगळवारच्या लिलावात कांद्याचे बाजारभाव खालीलप्रमाणे राहिले:

  • किमान दर: ४०० रुपये प्रतिक्विंटल
  • कमाल दर: २,००० रुपये प्रतिक्विंटल
  • सरासरी दर: १,२०० रुपये प्रतिक्विंटल
  • एकूण आवक: १५१७ क्विंटल (३०३४ पिशव्या)

सध्या कांद्याला मिळत असलेल्या या सरासरी दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असून, बाजारातील आवकही स्थिर असल्याचे चित्र आहे.

phaltan-apmc-onion-market-rates-2-june

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!