फलटण: अखेर कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय यांची बदली

महावितरणच्या फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय यांची प्रशासकीय कारणास्तव जळगाव परिमंडळातील पाचोरा विभागात बदली करण्यात आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १८ जून : महावितरणच्या फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय यांची प्रशासकीय कारणास्तव अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांची जळगाव परिमंडळातील पाचोरा विभाग येथे नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत आदेश महावितरण प्रशासनाने काढले आहेत.

महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी या बदलीसंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. प्रदीप ग्रामोपाध्याय हे बारामती परिमंडळांतर्गत येणाऱ्या फलटण विभागात कार्यकारी अभियंता (वितरण) या पदावर कार्यरत होते.

प्रशासकीय कारणास्तव त्यांची येथून बदली करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामोपाध्याय यांना त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी म्हणजेच पाचोरा विभाग, जळगाव परिमंडळ येथे तात्काळ रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यासाठी त्यांना स्थानिक पातळीवर पर्यायी व्यवस्था करून तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!