प्रोफेसर डॉ. विलास आढाव यांची संचालकपदी नियुक्ती


दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । सातारा । प्राध्यापक डॉ. विलास आढाव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांची ‘आजीवन आध्ययन व विस्तार विभाग’ संचालकपदी निवड झाली आहे.

डॉ. विलास आढाव यांनी १ जून २०२२ रोजी संचालकपदाचा पदभार स्वीकारला. डॉ. आढाव यांनी १९९२ ,ध्ये अर्थशास्त्राचे व्याख्याते म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नसरापूर, जि. पुणे येथे प्रारंभ केला. सण १९९३ पासून पुणे विद्यापीठ प्रौढ निरंतर शिक्षण आणि विस्तार विभागात प्रकल्प अधिकारी, व्याख्याता, वरिष्ठ व्याख्याता आणि प्रपाठक म्हणून काम केले. सध्या ते आजीवन शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात प्राध्यापक तसेच अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार पहात आहेत. डॉ. आढाव यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आणि कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांचे फुले, आंबेडकर, पुरोगामी चळवळ आणि समाजातील दुरबा घटकांचे उत्थान या विषयावर ३०० हुन अधिक लेख विविध वृत्तपत्रे, नियतकालिके आणि मासिकांमध्ये प्रकाशित झले आहेत. १९९९ ते २०२८ दरम्यान त्यांची मराठी व इंग्रजीमध्ये सुमारे २३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच डॉ. आढाव यांचा अध्ययन, अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रातील ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.

बँकॉक थायलंड येथील महाचुलॉंग कॉर्नरज विद्यालय विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी डॉ. आढाव यांना संयुक्त परिषद आणि शाही थायी सरकार यांनी १२ व्या संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या तीन-दिवसीय कार्यक्रमाकरिता खास आमंत्रित केले होते. डॉ. आढाव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रौढ, निरंतर शिक्षण आणि विस्तार सेवा तदर्थ मंडळाचे सदस्य होते. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभाग, स्पायसर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि एस. पी. कॉलेज पुणे यांच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. श्रीकृष्ण देवराय विद्यापीठ, अनंतपूर, आंधरप्रदेशच्या प्रौढ, निरंतर शिक्षण आणि विस्तार अभ्यास मंडळाचेही ते सदस्य आहेत. तसेच ते प्रौढ शिक्षण, अर्थशास्त्र आणि वाणिज्य या विषयातील मान्यताप्राप्त संशोधक, मार्गदर्शक आहेत.

सन २००६ चा सर्वोत्कृष्ठ शिक्षणतद्न्य पुरस्कार प्रदान करून पुणे महानगरपालिका, पुणे यांनी डॉ. आढाव यांच्या संशोधन आणि अध्यापनाच्या प्रशंसनीय कार्याचा गौरव केला आहे. त्याचबरोबर त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच नुकताच २१ एप्रिल २०२२ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागातर्फे डॉ. आढाव यांनी लिहिलेल्या ‘चिरेबंदी कृषीबाजार आणि दुरबल शेतकरी’ या संशोधन ग्रँथास २०२१-२२ चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ठ ग्रन्थ उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. तसेच ग्रँथालय, संचनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सन २०२९ व २० मध्ये प्रकाशित व संचनालयास प्राप्त झालेल्या ग्रथामधून ग्रन्थ निवड समितीने शिफारस केलेल्या मराठी ग्रन्थामध्ये डॉ. आढाव यांनी लिहिलेल्या ‘चिरेबंदी कृषीबाजार आणि दुरबल शेतकरी’ या पुस्तकाचा समावेश केला आहे. विद्यापीठाच्या आजीवन आध्ययन व विस्तार विभागाच्या संचालकपदाच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!