
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद हिच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश महिला मोर्चा तर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. दिपाली सय्यद यांच्या विरुद्ध नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, प्रणिता चिखलीकर-देवरे, अॅड.वर्षा डहाळे, रिदा रशीद, रिटा मकवाना, शिल्पा गणपत्ये, प्रिया शर्मा आदींच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सय्यद यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याचे निवेदन दिले.



