
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, वावरहिरे, दि. २० : माण तालुक्यामध्ये ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या होत्या. त्यामध्ये १४ ग्रामपंचायती बिनविरोध होऊन ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या आधीच्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत केली जात होती. परंतु यंदा सरपंच पदाची आरक्षणाची सोडत अद्यापही झालेली नाही. त्यामुळे गावचा कारभार हाकण्यासाठी गाव कारभारी म्हणजेच सरपंच कोण होणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
