स्व. इंदिरा गांधी यांना १०४ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि.१९ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना १०४ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच सामूहिक राष्ट्रीय एकात्मता शपथ घेण्यात आली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी  निष्ठापूर्वक काम करीन, तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन, अशी शपथ यावेळी सर्वांनी घेतली. यावेळी राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर, अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. 


Back to top button
Don`t copy text!