ब्रेकिंग न्यूज! फलटण आणि महाबळेश्वरच्या निवडणुका काही दिवस पुढे! ‘स्थैर्य’चं वृत्त खरं ठरतयं?. उमेदवार तेच, पण प्रक्रिया छाननीपासून पुन्हा. वाचा सविस्तर…

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. २९ नोव्हेंबर : सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकांबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. या दोन्ही निवडणुका आता १५ ते २५ दिवस पुढे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून काही वेळातच अधिकृत आदेश पारित होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ‘स्थैर्य’ने कालच (दि. २८) याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते, ते आज तंतोतंत खरे ठरण्याची दाट शक्यता आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी जिल्हा न्यायालयात निवडणूक प्रक्रियेबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. नियमानुसार या याचिकेचा निकाल ३ दिवसांत देणे अपेक्षित होते. मात्र, जिल्हा न्यायालयाने याचा निकाल देण्यासाठी ७ ते ८ दिवसांचा कालावधी घेतला.

या विलंबामुळे नियोजित निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक कोलमडले. याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्याचा निकाल आता लागला असल्याची माहिती आहे. तसेच, जिल्हा न्यायालयाच्या या दिरंगाईमुळे खुद्द निवडणूक आयोग सुद्धा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते.

उमेदवारांना दिलासा; प्रक्रिया कुठून सुरू होणार?

निवडणूक पुढे गेल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, मात्र आता चित्र स्पष्ट होत आहे.

उमेदवार तेच राहणार: नव्याने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार नाही. ज्यांनी अर्ज भरले आहेत, तेच उमेदवार रिंगणात असतील.

छाननीपासून फेरप्रक्रिया: निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे रद्द झालेली नाही, तर ती ‘छाननी’ (Scrutiny) प्रक्रियेपासून पुन्हा नव्याने राबवली जाईल.

त्यामुळे आता प्रचाराच्या तोफा काही काळासाठी थंडावणार असून, प्रशासकीय स्तरावर नव्याने वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!