झैनबिया स्कूल कटफळ चा इयत्ता.१०वी चा १००% निकाल


दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२२ । बारामती । केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या झालेल्या निकालात झैनबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन करून उत्तुंग भरारी घेतली व दरवर्षीप्रमाणे यावर्षीही यशाची परंपरा जपली. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीचा निकाल १००% टक्के लागला. कु. प्रणव जगदाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावून त्यास ९६.२०% मिळाले.कु. शिव गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक पटकावून त्यास ९३% मिळाले. कु. कृष्णा काळे व श्रेयश कोकाटे या दोन्ही विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला त्यांना ९१.०४%. मिळाले. या आनंदाच्या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका. इन्सीया नासिकवाला व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!