• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

रिपब्लिकन पक्षाच्या खटाव तालुका अध्यक्षपदी युवा नेते कुणाल गडांकुश  

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 17, 2023
in प्रादेशिक
वडूज येथे रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष श्री गडांकुश व सरचिटणीस श्री भंडारे यांचा सत्कार करताना मान्यवर

वडूज येथे रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष श्री गडांकुश व सरचिटणीस श्री भंडारे यांचा सत्कार करताना मान्यवर


दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । वडूज । पुरोगामी विचाराची बांधिलकी स्वीकारून सर्वसामान्य दलित,  शोषित, कष्टकरी व शेतकरी यांना न्याय देण्याची भूमिका घेणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(.नेते मंत्री आठवले गट) यांच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका अध्यक्ष म्हणून श्री कुणाल गडांकुश  व संतोष भंडारे यांची सरचिटणीस पदी संतोष भंडारे यांचीही निवड झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये अत्यंत संयमी नेतृत्व म्हणून श्री कुणाल गडांकुश यांच्याकडे पाहिले जाते. गेली पंधरा वर्ष रिपब्लिकन पक्षाच्या वाटचाली सोबतच त्यांनी अनेकांना मानवता भावनेतून अर्थसहाय्य केलेले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ते मनोभावे सेवा करत आहेत.छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित समाजासाठी आपले आयुष्य  खर्च केले आहे. त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी म्हणून श्री  गडांकुश हे खटाव तालुक्यामध्ये काम करत आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. आगामी सातारा जिल्हा परिषद व खटाव -माण पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबतची आघाडी कायम करून रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळावा. यासाठी ते प्राधान्य देणार असून शासकीय पातळीवर सर्वसामान्य घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी अध्यक्षपदाचा वापर केला जाईल. व्यक्ती म्हणून पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष  जरी असलो तरी रिपब्लिकन पक्षाचे व घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते हेच अध्यक्ष असून मी कामकाज करतील.मी फक्त रिपब्लिकन पक्षाचा पाईक आहे. असेही त्यांनी निवडीनंतर नम्रपणे सांगितले.

रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते अशोक गायकवाड, संतोष तथा तात्यासाहेब गायकवाड,  जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, ज्येष्ठ नेते अशोक  मदने व शैलेंद्र जाधव,शुभम रामुगडे, अजित नलवडे,युवा नेते मयुर बनसोडे, राजेंद्र जगताप, शंकर लोकरे, नाथा कंठे,  अनिता तोरणे, जोशना सरतापे,योगेश हिरवे,  अजित  कंठे व भाजप सोशल मीडिया प्रमुख शेखर पाटोळे,अजित जगताप,तानाजीराव पवार तसेच अनेक मार्गदर्शक नेत्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीमध्ये माजी खटाव तालुकाध्यक्ष श्री गणेश भोसले यांचे योगदान विसरता येणार नाही.  पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे.  सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग पक्षासाठी मोठे योगदान ठरणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.असे ही स्पष्ट केले आहे.


Previous Post

हजारो – लाखोंनी पगार; वरकमाई वेगळीच; मग पेन्शन कशाला हवी ?; पेन्शन ऐवजी राज्यातील लाखो युवकांना रोजगार देणे गरजेचे

Next Post

जुन्या पेन्शन आंदोलकांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

Next Post
वडूज ता.खटाव येथे जुन्या पेन्शन साठी पाठींबा देताना वंचित बहुजन आघाडीचे नेतेगण मंडळी (छाया-अजित जगताप,सातारा)

जुन्या पेन्शन आंदोलकांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!