जेसीबीसह तरुण 30 फूट खोल विहिरीत कोसळला : चालकाचा जागीच मृत्यु


 

स्थैर्य, सातारा, 20  : शेतामध्ये गाळ काढत असताना जेसीबी मशीनसह तरुण ३० फूट खोल विहिरीत कोसळल्याची घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे. विहिरीमध्ये पाणी असल्याने चालकाचा बुडून जागीच मृत्यू झाला आहे.

माण तालुक्यातील बिदाल गावात ही घटना घडली. आज सकाळी वैभव मुळीक नावाचा तरुण जेसीबी मशीनच्या सहाय्याने विहिरीतील गाळ काढण्याचं काम करत होता. विहिरीच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छ केल्यानंतर विहिरीतील गाळ काढण्यास सुरुवात केली. पण अचानक जेसीबी विहिरीत कोसळला. जेसीबीच्या केबीनमध्ये हा तरुण अडकून पडला आणि जेसीबीसह विहिरीच्या गाळात अडकून गेला. त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण यात त्याला यश मिळाले नाही. 30 फूट खोल विहिरीमध्ये पाणी असल्याने चालकाचा बुडून जागीच मृत्यू झाला आहे.

ही धक्कादायक घटना समजताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. विहिरीत पडलेल्या जेसीबी आणि त्यामध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी इतर जेसीबीच्या माध्यमातून प्रयत्न केला. परंतु, चालकाला वाचवणाऱ्या नागरिकांना आणि पोलिसांना यश आले नाही. जेसीबी चालकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!