बुध येथे तरुणाची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या


 

स्थैर्य, विसापूर (जि. सातारा), दि.२३ : बुध (ता. खटाव) येथील बुद्देश्वर मंदिराच्या परिसरात एका तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. धनंजय भगवान जगदाळे (वय 32, रा. बुध) असे मृताचे नाव आहे. काल सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पुसेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धनंजय भगवान जगदाळे याने शनिवार सायंकाळी 6 ते रविवारी (दि. 22) सकाळी 9 वाजण्यापूर्वीच्या कालावधीत बुद्देश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या करंजाच्या झाडाच्या फांदीस दोरीने गाळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची अकस्मात सीआरपीसी 174 प्रमाणे पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महाविकास आघाडी च्या उमेदवाराना भरघोस मतांनी निवडुन द्या – मंत्री बाळासाहेब पाटील


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!