प्रहार शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी यशवंत जगताप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । फलटण । खुंटे ता. फलटण येथील यशवंत जगताप यांची नुकतीच फलटण तालुका प्रहार शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यशवंत रमेश जगताप हे एक उत्तम व आदर्श शिक्षक असून सध्या ते जिल्हा परिषद शाळा वाजेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

या अगोदर मोही ता. माण येथे त्यांनी शिक्षक म्हणून उत्तम काम केले आहे. गेल्या वर्षी त्यांना फलटण तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे यशवंत जगताप हे शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने धडपडत असून शिक्षकांना न्याय मिळावा अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडतात. ते उत्तम लेखकही आहेत त्यांच्या निवडीबद्दल समस्त शिक्षक बांधवांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

त्यांच्या निवडीबद्दल प्रहार संघटनेचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. बच्चु कडू, प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष माननीय महेशजी ठाकरे, प्रहार शिक्षक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल लवटे, प्रहार शिक्षक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पडर व मित्रपरिवार यांनी यशवंत जगताप यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button
Don`t copy text!