अंडरटेकरची WWE मधून निवृत्ती:आपल्या फेमस वॉकसह रिंगमध्ये घेतली शेवटची एंट्री

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.२३: वेटरन अमेरिकन रेसलर आणि WWE
सुपरस्टार द अंडरटेकरने रविवारी निवृत्ती घेण्याची घोषणा केली. अंडरटेकर
रविवारी वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट (WWE) सरवायवर सीरीज 2020 दरम्यान
शेवटचे रिंगमध्ये दिसले. यावेळी त्यांनी आपल्या फेमस वॉकसह रिंगमध्ये
एंट्री घेतली. 22 नोव्हेंबर 1990 ला डेब्यू करणाऱ्या अंडरटेकरने 22
नोव्हेंबर 2020 ला WWE ला निरोप दिला.

सैन्यात मेजर असल्याचे सांगून १७ कुटुंबांना गंडा; ६ कोटींची लूट

WWE
ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे अंडरटेकरने एक पोस्ट केली. यात लिहीले
की, रिंगमधील माझी वेळ संपली आहे. आता अंडरटेकरला निरोप द्या. यादरम्यान
WWE लीजेंड द रॉक, जॉन सीना, ट्रिपल एच, शॉन मायकल्स, रिक फ्लेअर आणि केनसह
अनेक सुपरस्टार उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अंडरटेकरचे 30 वर्षांच्या
करिअरसाठी आभार मानले.

1990 मध्ये खेळला होता पहिला सामना

अंडरटेकरने
22 नोव्हेंबर 1990 ला सरवायवर सीरीजद्वारे WWE मध्ये पदार्पण केले होते.
अंडरटेकरने 7 वेळा WWE चॅम्पियनशिप आपल्या नावे केली आहे. आगळ्या-वेगळ्या
रिंग वॉकद्वारे अंडरटेकरला ओळख मिळाली होती.

एप्रिलमध्ये खेळला अखेरचा सामना

55
वर्षीय अंडरटेकरने WWE मध्ये आपला अखेरचा सामना रेसलमेनिया 36 मध्ये AJ
स्टाइल्सविरोधात खेळला होता. या सामन्यात अंडरटेकरला विजय मिळाला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!