‘ चैत्यभूमीवर गर्दी न करता जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा’- उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि.२३: येत्या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. पण, कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये,’ असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखवण्याची वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्याय्याविरोधात संघर्ष करत राहीले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. चैत्यभूमीवर गर्दी न करता जिथे आहात, तिथूनच बाबासाहेबांना अभिवादन करा,’ असे आवाहन मुख्यमंत्र्यानी यावेळी केले.

कोपर्डे हवेलीत सिध्दनाथ-माता जोगेश्वरी हत्तीवर स्वार; आकर्षक पूजेने वेधले लक्ष

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही 6 डिसेंबरला अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे, या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. याशिवाय समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांच्या कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण होईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!