साताऱ्यातील भरदिवसा टाकलेल्या दरोड्यात कामगाराचा हात : सातारा एलसीबीकडून तिघांना अटक


दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । सातारा । शहरातील पोवई नाक्यावर दोन दिवसापूर्वी भरदिवसा बँकेत 1 लाख 52 हजार रुपये भरायला निघालेल्या कामगाराला रस्त्यात अडवून मारहाण करून दरोडा टाकला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) या दरोड्यातील तिघांना अटक करण्यात आली असून, अजून तीन संशयितांचा शोध सुरु आहे. दरम्यान, दुकानात काम करणार्‍या कामगारानेच हा कट रचल्याचे पोलिसांना तपासात समोर आले आहे. शुभम हनुमंत साठे उर्फ ऋषीकेश, गौरव अशोक भिसे उर्फ ट्यॅटू, राकेश कृष्णा सोनकांबळे (तिघे रा. मल्हारपेठ, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार धर्मराज गुंजले व संशयित राकेश सोनकांबळे हे सातार्‍यातील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करत आहेत. शुक्रवारी दि. 25 रोजी गुंजले दुकानातील 1 लाख 52 हजार रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी पोवई नाक्याकडे जात असताना, त्याला रस्त्यात अडवून चार संशयितांनी मारहाण करत रक्कम चोरली. पैसे चोरुन नेत असताना तक्रारदार यांनी प्रतिकार केला हाेता. भरदिवसा घडलेल्‍या या घटनेने परिसर हादरुन गेला. सातारा शहर व एलसीबी याचा तपास करत असताना एलसीबीला तपासाला यश आले.


Back to top button
Don`t copy text!