दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२३ । बारामती । बारामती मध्ये राहणाऱ्या माणतालुक्यातील महिला भगिनींचा सन्मान सोहळा आयोजित केला होता, याप्रसंगी ब्रह्मचैतन्य घराण्याच्या वंशज लक्ष्मी कुलकर्णी प्रमुख उपस्थिती म्हणुन उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देशमुख नानी यांनी भूषवले.या प्रसंगी ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आरतीने सुरवात झाली.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या ११माणवासीय भगिनींचा शाल,श्रीफळ व सन्मान मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.मोठया प्रमाणात माणवासीय बांधव सहकुटुंब उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.शामराव राऊत,डॉ. आशिष जळक , शशिकांत देशमुख ,अशोक देवकर, मनोज देवकर, आप्पासो भांडवले, पिंटूशेठ खाडे, सागर खाडे, दत्ता बळीप, शिवाजी बोराटे,अंकुश कदम, शंकर कचरे ,बापूराव खाडे,पांडुरंग अवघडे, रामचंद्र भोसले, किरण व्होरा व इतर पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पांढरे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांना कार्यकमाचे आभार दिग्विजय गायकवाड यांनी मानले.