
दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । सातारा । पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांचे प्रतिपादन सातारा दिनांक आठ प्रतिनिधी महिलांनी आपल्या खंबीर मानसिकतेचा नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परिचय दिला आहे. त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःचा विकास साधला पाहिजे. एवढेच नव्हे तर आपल्या कर्तुत्वाने नवीन मापदंड निर्माण करायला हवेत आणि यामध्ये त्या कुठेच कमी पडणार नाहीत अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने येथील अलंकार हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना बन्सल बोलत होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, माजी नगराध्यक्ष माधवी कदम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जाने खराडे आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, तळबीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बंसल पुढे म्हणाले, जागतिक महिला दिनाचे औचित्य मोठे असून स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. महिलांनी स्वतःच्या क्षमता सातत्याने विकसित करायला हवे. आपल्या कर्तृत्वाला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्या सातत्याने सिद्ध करण्यासाठी त्यांनी सिद्ध असायला हवे त्यातून कर्तुत्वाचे वेगवेगळे मापदंड आपोआप तयार होत राहतील अनेक महिलांनी यशस्वीरीत्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे त्यामुळे महिला सक्षमीकरण आला सातत्याने कृतीचे बळ मिळायला हवे अशा अपेक्षा बंसल यांनी व्यक्त करून सत्कारमूर्ती महिलांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या नगराध्यक्ष माधवी कदम म्हणाल्या महिलांनी स्वकर्तुत्वावर पुढे यावे कुठेही आणि कोणत्याही क्षेत्रात आपण कमी नाही हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये ही धडाडीच्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून अशा महिला पोलिसांमुळे सुद्धा कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचा निर्वाळा माधवी कदम यांनी दिला वैद्यकीय विभागातील अधिपरीचारिका गीता पवार एसटी महामंडळ यातला वाहक रेखा वाजे जिल्हा पोलिस दलातील दिपाली यादव आंतरराष्ट्रीय धावपटू व उद्योजक कांचन कुचेकर प्लंबर महिला उज्वला मोरे इलेक्ट्रिशियन महिला कामगार अरुणा फाळके स्कूल बस चालक सुजाता सोनटक्के सफाई कामगार आणि दाखोडे अंगणवाडी सेविका सुनिता साळुंखे आरडी परेड राजपथ दिल्ली युनिटच्या महिला पोलीस नाईक सोनाली बनकर कोर्ट कामकाज पाहणाऱ्या पोलीस हवालदार सुवर्णा निकम बामनोली येथे दुर्गम भागातील क्षेत्रात नावेतून प्रवास करणाऱ्या रणरागिणी विद्यार्थिनी सुरेखा सपकाळ साधिका संकपाळ पारो श्रीरंग सांग प्रियांका सकाळ शितल पवार या सर्व महिलांचा उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल चांदणे खराडे व पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने महिला अत्याचारासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेनकर भरोसा सेल यांनी सखोल मार्गदर्शन केले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिके सादर केली या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील 264 महिला उपस्थित होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ आणि ताम्हणकर अंडी चव्हाण सहाय्यक फौजदार राऊत पोलीस हवालदार एमडी बाचल पोलीस हवालदार एस यु पवार पोलीस हवालदार लोखंडे आरडी तोरस्कर मोहिते टीव्ही वाघमारे पोलीस हवलदार डीडी भागडे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.