
थेट WhatsApp वर मिळवा
राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने विविध कारणांमुळे सात महत्त्वाच्या योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असून, काही योजना टप्प्याटप्प्याने बंद होणार असल्याने सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १९ ऑक्टोबर : महिला आणि बालविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांपैकी जवळपास सात योजनांना कात्री लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही योजनांवर होणारा कमी खर्च, निधीची अपुरी मागणी आणि अपुरा प्रतिसाद यांसारख्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, यातील काही योजना तात्काळ प्रभावाने तर काही टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहेत.
योजना बंद करण्यामागची कारणे आणि स्वरूप
महिलांसाठी बहुउद्देशीय सामाजिक केंद्रे, महिला मंडळांना अनुदान, देवदासींच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी साह्य आणि वीज नसलेल्या अंगणवाड्यांसाठी सौरऊर्जा संच या योजनांवर मर्यादा आल्या आहेत. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना, निवारागृह चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना साह्य आणि करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आर्थिक मदत यांसारख्या योजनांना देखील टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





