केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीपूर्वी ३० दिवसांच्या बोनसला मंजुरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

वित्त मंत्रालयच्या व्यय विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराएवढा बोनस दिला जाणार असून, यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १९ ऑक्टोबर : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ३० दिवसांच्या तदर्थ (एड-हॉक) बोनसला मंजुरी दिली असून, यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

पात्रता आणि बोनसची रक्कम

या निर्णयाचा लाभ केवळ पात्र कर्मचाऱ्यांनाच मिळणार असून, यामध्ये प्रामुख्याने गट ‘सी’ (Group C) आणि अराजपत्रित गट ‘बी’ (Group B Non-Gazetted) मधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सशस्त्र दलातील पात्र कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे.

बोनसच्या गणनेसाठी कमाल मर्यादा ७ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. या सूत्रानुसार पात्र कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त ६ हजार ९०८ रुपयांपर्यंतचा बोनस मिळण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा असलेल्या किंवा इतर अटी पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियमांनुसार आनुपातिक पद्धतीने लाभ दिला जाईल.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!