
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, वाई, दि. २०: अकोशी (ता. वाई) येथील महिलेचा शेतातील पेटलेल्या गवतामध्ये भाजून जागीच मृत्यू झाला. गंगुबाई पांडुरंग भणगे (वय 70) असे त्या महिलेचे नाव आहे.
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील आकोशी येथील रहिवासी असलेल्या गंगुबाई पांडुरंग भणगे रविवारी दुपारी एकट्याच घवली फाटा नावाच्या शिवारातील शेतातील बांधांवर वाढलेले गवत पेटवून देत होत्या. अचानक वार्याचा वेग वाढला व वार्याने दिशा बदलल्याने आगीने उग्र रुप धारण केले. वार्याने दिशा आगीची दिशा अचानकपणे बदलल्याने त्यांच्या साडीने पेट घेतला. यामुळे भाजुन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाल्याची माहिती मिळू शकली नाही.
