गिरवी येथे मेंढ्या चारू नका म्हटल्यावरून महिलेस मारहाण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२४ | फलटण |
गिरवी (तालुका फलटण) गावच्या हद्दीत ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वाघजाई तलाव नावाच्या शिवारात ‘आमच्या क्षेत्रात मेंढ्या चारू नका’, असे म्हणाल्याच्या कारणावरून चिडून जाऊन फिर्यादी महिलेस शिवीगाळ, दमदाटी करून हातातील कळकाच्या काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून याची फिर्याद स्वाती गणेश मदने (रा. जननी मळा, वाघजाई तलाव, गिरवी, तालुका फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मधुकर मोतीराम मदने (रा. गिरवी, ता. फलटण) याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एएसआय एक्के करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!