देशामध्‍ये ईव्‍हींचे भवितव्‍य आहे उज्‍ज्‍वल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२३ | मुंबई | गेल्‍या काही वर्षांपासून ऑटोमोबाइल्‍सना ऊर्जा देण्‍यासाठी वीजेचा वापर करण्‍याच्‍या संकल्‍पनेचा विचार केला जात आहे. पण, या ऑटोमोबाइल्‍सचे उत्‍पादन व अंमलबजावणीमधील वाढ संथ गतीने होती. जवळपास दोन दशकांपूर्वी पहिल्‍या काही हायब्रिड वेईकल्‍स अस्तित्‍वात आल्‍या आणि या वेईकल्‍स पारंपारिक वेईकल्‍सच्‍या वापरकर्त्‍यांची पहिली पसंती ठरल्‍या नसल्‍या तरी त्‍यामुळे आज ऑल-इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या उत्‍पादनाला चालना मिळाली. आज त्‍यांचे उत्‍पादन पूर्वीच्‍या हायब्रिड वेईकल्‍सच्‍या तुलनेत झपाट्याने होत आहे. ईव्‍हींप्रती समर्पित संसाधने असण्‍यासोबत संशोधन केले जाण्‍यासह देशामध्‍ये ईव्‍हींचे भवितव्‍य उज्‍ज्‍वल असल्‍यासारखे वाटते. अशा भवितव्‍याला चालना देणारे घटक अनेक असून याबद्दल सांगताहेत इकोफायच्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री नाम्बियार.

  1. पर्यावरणावरील प्रभाव: आजच्‍या ईव्‍हींमध्‍ये टेलपाइपमधून शून्‍य उत्‍सर्जन करण्‍याची क्षमता आहे. ईव्‍हींसाठी जीवाश्‍म इंधनांची गरज नाही, तसेच ईव्‍हींमधून कोणत्‍याही प्रकारचा धूर उत्‍सर्जित होत नाही. म्‍हणून या वेईकल्‍सच्‍या वापरामुळे ग्रीनहाऊस वायूंच्‍या निर्मितीमध्‍ये वाढ न होण्‍यासह हवामान बदलाप्रती प्रमुख योगदान देतात. पर्यावरणाला फायदा होण्‍याव्‍यतिरिक्‍त ईव्‍हींच्‍या या असाधारण दर्जामुळे हवेचा दर्जा शुद्ध होतो, ज्‍यामुळे सार्वजनिक आरोग्‍य उत्तम राहते.
  2. किफायतशीर: ईव्‍हीची किंमत नियमित पेट्रोल किंवा डिझेल-संचालित वेईकलच्‍या तुनलेत काहीशी उच्‍च असली तरी ईव्‍हीसाठी इंधनाची गरज लागत नाही. इंधनाच्‍या किमती वाढत आहेत, पण ईव्‍हीसाठी इंधनाचा अतिरिक्‍त खर्च करावा न लागत असल्‍यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होते. म्‍हणून ईव्‍ही दीर्घकाळापर्यंत आर्थिकदृष्‍ट्या अपरिहार्य पर्याय आहे. तसेच ईव्‍हींमध्‍ये गुंतागूंतीची यंत्रणा नसल्‍यामुळे त्‍यांचा मेन्‍टेनन्‍स देखील कमी आहे, म्‍हणून कार्यसंचालन खर्च देखील कमी होतो. तुमच्‍या स्‍वप्‍नवत ईव्‍हीचे मालक बनण्‍यास मदत करू शकणारे सोल्‍यूशन्‍स व ऑफरिंग्‍ज सहजपणे उपलब्‍ध आहेत.
  3. नॉइजलेस (आवाजविरहित): ईव्‍हींमध्‍ये कंपण निर्माण करणारे अंतर्गत कम्‍बशन इंजिन नसल्‍यामुळे त्‍यांच्‍यामधून कमी आवाज येतो. या तंत्रज्ञानामुळे वायू प्रदूषण कमी होण्‍याप्रती मदत होते. आवाज कमी असल्‍यामुळे वायू प्रदूषणाशी संबंधित तणाव व चिंता देखील मोठ्या प्रमाणात कमी होतात, तसेच राइडिंग अनुभव अधिक आनंददायी होतो.
  4. कॉम्‍पॅक्ट (सुसंगत): दुचाकींच्‍या बाबतीत गुंतागूंतीच्‍या मशिनरी नसल्‍यामुळे ईव्‍ही वजनाने अधिक हलक्‍या व सुसंगत आहेत, ज्‍यामुळे पार्किंग व मॅन्‍युअर करणे सोपे जाते. नियमित बाइक्समध्‍ये असलेले अतिरिक्‍त पार्टस् नसल्‍यामुळे ईव्‍हींमध्‍ये अधिक स्‍टोरेज जागा आहे.

डिझाइन, आर्थिक व्‍यवहार्यता व पर्यावरणास अनुकूल स्‍वरूपासह ईव्‍ही उज्‍ज्‍वल व हरित भविष्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहेत आणि याद्वारे भविष्‍यामध्‍ये पर्यावरणाला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. ईव्‍हींसाठी इलेक्ट्रिसिटीचे स्रोत जसे कोळसा-इंधन किंवा इतर प्रकारचे स्रोत उपलब्‍ध असण्‍याबाबत चिंता असली तरी ईव्‍हींच्‍या दीर्घकालीन वापरामुळे घातक उत्‍सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल. एंटरप्राइजेस वॉरंटीमध्‍ये वाढ आणि प्रभावी बाय-बॅक पॉलिसी ऑफर करत असताना बहुतांश व्‍यक्‍ती ईव्‍ही खरेदी करण्‍याचा विचार करत आहेत. अधिकाधिक व्‍यक्‍ती ईव्‍हींचा अवलंब करू लागले असल्‍यामुळे देशभरात ईव्‍ही चार्जिंग युनिट्समध्‍ये देखील वाढ होताना दिसत आहे, ज्‍यामुळे वेईकल पुरेशी चार्ज असल्‍याशिवाय लांबचा प्रवास करू न शकण्‍याच्‍या समस्‍येचे निराकरण होत आहे. खरेतर काही ईव्‍हींसोबत त्‍यांचे स्‍वत:चे चार्जिंग युनिट येतात, जे घरामध्‍ये इन्‍स्‍टॉल करता येऊ शकतात. ईव्ही सहजतेने उपलब्ध होत असल्‍याचे पाहता येणाऱ्या दिवसांचा अविभाज्य भाग बनतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही.


Back to top button
Don`t copy text!