विंग्‍जने लाइफस्‍टाइल टीडब्‍ल्‍यूएस इअरबड्स ‘फ्लोबड्स २००’ लाँच

५० तासांपर्यंतचा प्रभावी प्‍लेटाइम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२३ । मुंबई । विंग्‍ज लाइफस्‍टाइल या भारतातील ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेल क्षेत्रामधील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या डायरेक्‍ट-टू-कंझ्युमर ब्रॅण्‍डने त्‍यांची पहिली नवीन लाइफस्‍टाइल टीडब्‍ल्‍यूएस इअरबड श्रेणी फ्लोबड्स २०० लाँच केली आहे. फ्लोबड्स २०० फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, ब्रॅण्‍डच्‍या ऑफिशियल वेबसाइटवर ८९९ रूपयांच्‍या लाँच किमतीत उपलब्‍ध आहे. टॅगलाइन साउंड उन्व्हेल्ड  शी बांधील राहत हे इअरबड्स सर्वोत्तम ऑडिओ अनुभवाची खात्री देतात. तसेच केस डिझाइन अर्ध-पारदर्शक असून अद्वितीय आहे.

अर्ध-पारदर्शक केस व्हिज्‍युअली आकर्षक असून त्‍यामध्ये अत्‍याधुनिकतेची भर करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे सर्वांचे लक्ष वेधले जाते. यामधील १३ मिमी हाय-फिडेलिटी ड्रायव्‍हर्स खात्री देतात की, प्रत्‍येक बीट व ताल सुस्‍पष्‍टपणे ऐकू येईल, ज्‍यामधून तुम्‍हाला अद्वितीय ऑडिओ अनुभव मिळेल. परिपूर्ण टच कंट्रोल्‍स आणि आयपीएक्‍स५ घाम व जलरोधक तंत्रज्ञानासह हे इअरबड्स साहसी कृत्‍यांसाठी परिपूर्ण सोबती आहेत.

सह-संस्‍थापक विजय वेंकटेश्‍वरन म्‍हणाले, “आम्‍हाला आमची पहिली नवीन लाइफस्‍टाइल टीडब्‍ल्‍यूएस इअरबड्स श्रेणी लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. फ्लोबड्स २०० ची स्‍लीक डिझाइन आणि प्रबळ कार्यक्षमता या लाँचसाठी परिपूर्ण आहेत. हे उत्‍पादन ट्रेण्‍डी डिझाइनवरील आमच्‍या फोकसवर भर देते, भारतीय तरूणांचे लक्ष वेधून घेते, तसेच वैशिष्‍ट्ये आधुनिक उद्योग ट्रेण्‍ड्सनुसार असण्‍याची खात्री देते.”

हे उत्‍पादन जवळपास ५० तासांपर्यंतचा प्रभावी एकूण प्‍लेटाइम देखील देते, तसेच एका चार्जमध्‍ये १० तासांचे इअरबड्स प्‍लेटाइम देते. फ्लोबड्स २०० च्‍या स्‍मार्ट ईएनसी (एन्‍व्‍हायरोन्‍मेंटल नॉईज कॅन्‍सलेशन) तंत्रज्ञानासह नकोसे कॉल्‍स आणि व्‍यत्‍ययांना दूर करा. गजबजलेल्‍या कॅफेमध्‍ये किंवा गजबजलेल्‍या रस्‍त्‍यावर असा हे इअरबड्स मोठ्याने व स्‍पष्‍टपणे आवाज ऐकू येण्‍याची खात्री देतात. फ्लोबड्स २०० मध्‍ये गेमर्ससाठी विशेष वैशिष्‍ट्य समर्पित गेम मोड आहे, तसेच जवळपास ४० एमएमपर्यंतची अल्‍ट्रा-लो लेटन्सी आहे.


Back to top button
Don`t copy text!