
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, कोळकी, दि. ८ : कोळकी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मध्ये धर्मराज देशपांडे व प्रभाग क्रमांक ४ मध्ये स्वप्नाली पंडित या अधिकृत उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. तरी कोळकी मधील जनतेने धर्मराज देशपांडे व स्वप्नाली पंडित यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.
कोळकी ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकताच कोळकी गावामध्ये विविध ठिकाणी करण्यात आला, त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.
कोळकी गावाचा विकास करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी गत काळामध्ये काहीही केलेले नाही. आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीला जर सत्तांतर करून कोळकीच्या ग्रामस्थांनी सेवा करण्याची संधी दिली. तर नक्कीच कोळकी गावामध्ये विकास घडल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीची केंद्रामध्ये सत्ता आहे व केंद्र सरकारकडून कोळकी गावासाठी विविध निधी मंजूर करून आणण्यासाठी कोळकी गावकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीची सत्ता कोळकी ग्रामपंचायतीवर स्थापन करण्याची संधी द्यावी. आगामी काळामध्ये कोळकी गावाचा विकास करण्यासाठी कोळकी गावामध्या परिवर्तन घडवून आणावे, असेही आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले आहे.



