तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार : श्रीमती सोनल पटेल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । फलटण । आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील कार्यकर्तांना ताकद देण्यासाठी पक्ष कमी पडणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव व पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी सोनल पटेल यांनी केली.

फलटण तालुका काँग्रेस कमीटीच्या पदाधिकाऱ्यांची हॉटेल आर्यमान येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी श्रीमती पटेल बोलत होत्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस चेतन चव्हाण, तालुकाध्य महेंद्र सुर्यवंशी – बेडके, कार्याध्यक्ष अमीर शेख, शहराध्यक्ष पंकज पवार, जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, युवक तालुकाध्यक्ष अंजिक्य कदम, उपाध्यक्ष नवनाथ लोखंडे, गंगाराम रणदिवे, शहराध्यक्ष प्रितम जगदाळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीन बागवान, शहर सरचिटणीस लक्ष्मण बेंद्रे, भारत अहिवळे, नितीन जाधव, सोपान जाधव, अभिलाष शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्तांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!