श्रीमंत विश्वजितराजे चषकामध्ये राजाळे क्रिकेट संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । फलटण । पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन फलटण तालुक्यातील सांगावी येथे करण्यात आलेले होते. दि. २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीमध्ये “श्रीमंत विश्वजितराजे चषक” या नावाने क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या.

यामध्ये राजाळे क्रिकेट संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तर करावाघज क्रिकेट संघाला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. व बारामती तालुक्यातील सांगवी क्रिकेट संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रात्प झालेले आहे. यासोबतच दौंड तालुक्यातील राहू क्रिकेट संघाला चतुर्थ क्रमांक प्राप्त झालेले आहे.

सदरील स्पर्धेचे आयोजन वाल्मिक बनकर, प्रविण मोरे, विकास शिंदे, हर्षद शेवते, दत्ता शेंडे, अरविंद मोरे, गणेश भोसले, अक्षय हाके यांनी केलेले होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!