‘सबका साथ, सबका विकास’च्या संकल्पाने साताऱ्यात भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

साताऱ्यात भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे यांच्यासह मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

स्थैर्य, सातारा, दि. ६ एप्रिल : “सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” या मंत्राने प्रेरित होऊन देशसेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करत साताऱ्यात भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापना दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीने राष्ट्रहित, सुशासन आणि जनसेवा या तत्त्वांशी प्रामाणिक राहून आज देशातील सर्वात मोठा आणि प्रभावी पक्ष म्हणून आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे. अनेक संघर्ष, चढ-उतार आणि कठीण परिस्थितीतही पक्षाने आपल्या विचारधारेवर ठाम राहून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे यांचे मार्गदर्शन

या स्थापना दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाला सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या, “पक्षाने आजवरचा प्रवास अत्यंत संघर्षातून केला आहे. कार्यकर्त्यांच्या अफाट मेहनतीमुळेच आज पक्ष या शिखरावर पोहोचला आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा ठेवून समाजसेवेसाठी अधिक जोमाने कार्य करावे.”

मान्यवरांची मांदियाळी

या स्थापना दिन सोहळ्याला साताऱ्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली.

याप्रसंगी राज्याचे मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, उपाध्यक्ष राजू भोसले, माजी आ. मदनदादा भोसले, लोकसभा संयोजक सुनील कटाकर, माजी आ. दिलीप येळगावकर, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा पंचायत समिती सभापती महेश गाडे, साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

यासोबतच नगरसेवक अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक अक्षय जाधव, फिरोज पठाण, विश्वतेज बालगुडे, तसेच जयकुमार शिंदे, रामकृष्ण वेताळ, विकास गोसावी, विठ्ठल बलशेठवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी या उत्साही सोहळ्याला उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!