विधानसभेसाठी भाजपा महायुतीतून अजित पवारांना बाहेर काढणार?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 14 सप्टेंबर 2024 | मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बाहेर काढण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार यांना महायुतीमध्ये घेवून भारतीय जनता पार्टीला तोटाच झाला असल्याची चर्चा सुद्धा लोकसभा निवडणुकीपासून आहे; त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका होवू नये म्हणून भारतीय जनता पार्टी महायुतीमधून अजित पवारांना बाहेर काढण्याची खेळी खेळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहांचा मुंबई दौरा

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पीछेहटिनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा दगाफटका होवू नये म्हणून भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही महत्वाचे पदाधिकाऱ्यांच्या सोबत आगामी विधानसभा निवडणुकीचा प्लॅन तयार केला असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो गायब

राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच प्रमुख राजकीय पक्ष हे आपले संवाद दौरे आयोजित करत आहेत. यामध्ये राज्यातील संवाद दौऱ्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या संवाद दौऱ्यातून ना. अजित पवारांचा फोटो गायब झाल्याने नक्की भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. यावर ना. अजित पवार यांना पत्रकारांनी छेडले असता “माझा फोटो सर्वत्र येत असतो! मीच सांगितले की माझा फोटो वापरू नका.” असे बोलून म्हणणे टाळले.

ना. अजित पवारांच्या आमदारांकडून लोकसभेला महायुती विरोधात काम

राज्यामध्ये अनेक मतदारसंघात उपुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात काम केले असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. यामध्ये प्रामुख्याने माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काम केले आसल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये संपूर्ण माढा लोकसभा मतदारसघांत लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची एक सुद्धा जाहीर सभा नसल्याचे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेहमीच बोलत असतात.

राज्यातील अनेक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आमदारांमुळे भाजपाची गोची

मागील वर्षी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा समावेश झाल्यानंतर राज्यातील अनेक विधानसभा मतदरसघांत भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांची गोची झाली असल्याचे बघायला मिळाली आहे. यामध्ये या महायुतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच पुणे जिल्ह्यातील मावळ, वडगावशेरी, इंदापूर व सातारा जिल्ह्यातील फलटण याठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते असल्याने या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा सामना होवू शकतो. यामुळेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपा नारळ देवू शकते.

यामुळे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून महायुतीमधून भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बाहेर काढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!