कर्तव्य बजावताना पोलिसाला वीरमरण, रस्त्याचे नामकरण करुन हुतात्मा कदमांचे स्मरण!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, पुसेसावळी, दि 1६ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला हुतात्मा पोलिस नाईक तुकाराम यशवंत कदम यांचे नाव देण्यात आले. या मार्गाच्या फलकाच्या अनावरणप्रसंगी मुंबई (ठाणे) येथील सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, औंध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर, खटाव पंचायत समितीच्या सभापती रेखा घार्गे, पंचायत समिती सदस्या जयश्री कदम, महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत कदम, पोलिस उपनिरीक्षक श्री. माने पोलिस हवालदार गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सन 2003 मध्ये पोलिस नाईक कदम यांनी कर्तव्य बजावताना अटक केलेला आरोपी चौथ्या मजल्यावरून पाइपच्या साह्याने पळून जाण्याचा प्रयत्न करताना स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पाइपच्या साह्याने खाली उतरत आरोपीला पकडले होते. मात्र, आरोपी आणि कदम या दोघांच्या झटापटीमध्ये पाइप तुटून दोघेही चौथ्या मजल्यावरून थेट खाली पडले. त्यात कदम यांचा मृत्यू झाला. 

कर्तव्य बजावताना कदम यांचा मृत्यू झाल्याने ठाणे आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांच्या मूळ गावातील रस्त्याला किंवा शाळेला नाव देण्याचा प्रस्ताव आल्याने पुसेसावळी येथील मुख्य पेठेतून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला “हुतात्मा तुकाराम यशवंत कदम’ यांचे नाव देण्यात आले. त्याबरोबर महात्मा गांधी विद्यालयात त्यांच्या कार्याची माहिती असणारा फलक मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आला. या वेळी प्रा. विजयकुमार संकपाळ, ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल कदम, नितीन वीर, शशिकांत पाटील, प्रा. संभाजी कदम, प्रा. कमलाकर घार्गे, प्रा. अमित पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!