गांधी-आंबेडकर हयात असते तर फॅसिझमविरोधात एकत्र आले असते : डॉ. गणेश देवी


 

स्थैर्य,सातारा, दि १६ : संविधानाच्या चौकटीला सध्या मोडतोड करण्याचे काम सुरू आहे आणि सध्याच्या परिस्थितीत जातीयवाद व धर्मांधता वाढू लागली आहे. या परिस्थितीत जर महात्मा गांधी व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर ते नक्कीच फॅसिझम विरोधी एकत्र आले असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी सातारा येथे बोलताना केले.

महात्मा गांधी सहा नोव्हेंबर 1920 रोजी वाई येथे व सात नोव्हेंबर 1920 रोजी सातारा आणि क-हाड येथे आलेल्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्याची माहिती देण्यासाठी डॉ. गणेश देवी हे सातारा येथे नुकतेच आले होते. त्यावेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाळासाहेब बागवान होते. यावेळी सुरेखा देवी, ह. भ. प. डॉ. सुहास फडतरे, कॉम्रेड. धनाजी गुरव, प्रा. डॉ. विजय माने, विजय मांडके, प्रा. गौतम काटकर हे विचारमंचावर उपस्थित होते.

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी फॅसिझम विरोधी एकत्र यायला हवे असे आवाहन करून डॉ. देवी म्हणाले, महात्मा गांधी यांच्या सातारा व क-हाड येथील दौर्‍याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक सलोखा, हिंदू- मुस्लिम ऐक्य, समता, सामंजस्य वाढवणे त्याचबरोबर संविधानिक लोकशाहीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक ऐक्य व्हावे, हिंदू-मुस्लिम ऐक्य व्हावे याच मताचे होते. त्यांचे विचार परस्परपूरक होते. ते एकमेकांचे शत्रू नव्हते असे प्रतिपादन यावेळी बोलताना विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी केले. अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांनी सामाजिक सलोखा व सामाजिक ऐक्यची गरज प्रतिपादन केली. प्रा. गौतम काटकर यांनी सूत्र-संचालन केले. प्रास्ताविकात डॉ. गणेश देवी यांची ओळख करून दिली.

विजय मांडके व प्रा. डॉ. मनीषा शिरोडकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी राजेंद्र गलांडे, डॉ. रवींद्र भारती, मिलिंद पवार, जयश्री माजगावकर, सुभाष सावंत, जीवन सर्वोदयी (इंगळे), प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, प्रा. डॉ. बी. बी. जाधव, प्रा. झांझुर्णे, राहुल गंगावणे, संकेत माने पाटील, शुभम ढाले, रश्मी लोटेकर आदी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!