आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र स्वीकारताना करण पोरे. भाजप ओबीसी मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी करण पोरे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, फलटण दि.१८: भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या राज्यउपाध्यक्षपदी करण पोरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण पोरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. ही निवड भाजपा ओबीसी मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केली आहे.

करण पोरे हे महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पोरे व सुवर्णाताई पोरे यांचे सुपुत्र आहेत. या निवडीनंतर करण पोरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने मला ओबीसी मोर्चाच्या राज्य उपाध्यक्ष पदाची संधी देऊन माझ्यावर जो विश्‍वास टाकला आहे त्या विश्‍वासाला पात्र राहून ओबीसी मोर्चा चे संघटन व पक्षवाढीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणार आहे.

या निवडीनंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह पावसकर, उपाध्यक्ष जयकुमार शिंदे आदी मान्यवरांनी पोरे यांचे अभिनंदन केले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!